Upcoming: आगामी Vivo T4x 5G ची लाँचपूर्वीच किंमत Leak! 50MP कॅमेरासह, मिळेल 50MP AI रियर कॅमेरा
Vivo चा आगामी स्मार्टफोन Vivo T4x 5G लवकरच लाँच होणार आहे.
कंपनीने नुकतेच भारतात Vivo V50 5G फोन लाँच केला आहे.
लीकनुसार, Vivo T4x 5G स्मार्टफोनमध्ये 50MP चा AI रियर कॅमेरा असेल.
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Vivo चा आगामी स्मार्टफोन Vivo T4x 5G लवकरच लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करेल. या फोनसाठी विवोने प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर एक मायक्रो वेबसाइट लाईव्ह केली आहे. या फोनबद्दल अनेक लीक्स ऑनलाईन पुढे येत आहेत. तर ताज्या लीकमध्ये फोनची किंमत आणि इतर महत्त्वाचे तपशील उघड झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, या फोनची अपेक्षित किंमत आणि सर्व लीक्स-
SurveyAlso Read: शानदार ऑफर्स लेटेस्ट Samsung Galaxy F06 5G ची Sale भारतात सुरु, किंमत 10,000 पेक्षा कमी
Vivo T4x 5G किंमत लीक
प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या मते Vivo T4x ची किंमत भारतात 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल. यामुळे भारतातील बजेट 5G सेगमेंटमध्ये तो इतर स्मार्टफोन्सना चांगली स्पर्धा देईल, असे बोलले जात आहे. मात्र, लेटेस्ट विवो फोनची खरी किंमत फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने नुकतेच भारतात Vivo V50 5G फोन लाँच केला आहे. आगामी फोन मार्च महिन्यात लाँच केला जाऊ शकतो.

Vivo T4x 5G चे लीक तपशील
एका प्रसिद्ध प्रकाशकाच्या ताज्या अहवालानुसार, Vivo T4x 5G स्मार्टफोनमध्ये 50MP चा AI रियर कॅमेरा असेल. फोनचा मागील कॅमेरा अनेक AI फीचर्सना सपोर्ट करेल. ज्यामध्ये AI इरेज, AI फोटो एन्हांस आणि AI डॉक्युमेंट मोड यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये देखील, T2x सारख्या Vivo T3x 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आढळू शकतो. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन विवोच्या अधिकृत वेबसाइट तसेच फ्लिपकार्टद्वारे विकला जाईल. परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर दिला जाईल.
जर मागील लीक झालेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, विवोचा हा आगामी स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाईल. यामध्ये प्रोंटो पर्पल आणि मरीन ब्लू यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर स्मार्टफोन डायनॅमिक लाईटसह येईल. फ्लिपकार्ट पेजवर असा दावा केला जात आहे की, फोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल. हा या सेगमेंटमधील सर्वात बारीक फोन आहे. कंपनी येत्या काळात फोनच्या इतर स्पेसिफिकेशनचा खुलासा करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile