लेटेस्ट स्मार्टफोनसाठी आत्ताच प्लॅन करा बजेट! लाँचपूर्वीच आगामी Vivo V50 ची किंमत Leak
Vivo च्या आगामी Vivo V50 स्मार्टफोनची किंमत लीक
हा विवो स्मार्टफोन 17 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच केला जाईल.
विवोचा V50 फोन इतक्या मोठ्या बॅटरीसह सर्वात स्लिम स्मार्टफोनपैकी एक असेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या आगामी Vivo V50 स्मार्टफोनची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्हाला फोन फोटोग्राफीची आवड असेल तर पुढील आठवड्यात भारतात हा उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच होणार आहे. हा विवो स्मार्टफोन 17 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच केला जाईल. या फोनबद्दल अनेक लीक्स पुढे येत आहेत. ताज्या लीकमध्ये, लाँचपूर्वीच या फोनची किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात आगामी Vivo V50 ची अपेक्षित किंमत-
SurveyAlso Read: अरे व्वा! Vivo V50 प्री-ऑर्डरवर मिळतील अप्रतिम बेनिफिट्स, जाणून घ्या काय मिळेल विशेष?

Vivo V50 ची किंमत Leak
ताज्या लीक अहवालानुसार, Vivo V50 5G फोन भारतात अनेक व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल. त्यानुसार, 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर, 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे. मोबाईलच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 12GB+ 256GB स्टोरेज असू शकतो, जो 40,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा विवो फोन रोझ रेड, स्टारी ब्लू आणि टायटॅनियम ग्रे या कलर ऑप्शन्ससह सादर केला जाऊ शकतो.
Vivo V50 अपेक्षित फीचर्स आणि स्पेक्स
कंपनीने पुष्टी केली आहे की Vivo V50 5G फोन अल्ट्रा स्लिम Quad Curved स्क्रीनसह येईल. लीकनुसार, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन 5 वर्षांसाठी लॅग-फ्री काम करू शकेल, असे सांगण्यात आले आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेट उपलब्ध आहे.

Vivo V50 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी Carl Zeiss लेन्स उपलब्ध असेल. हा मोबाईल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल, ज्यामध्ये 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP चा OIS मेन सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा असेल. त्याबरोबरच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली जाईल, जी 80W फास्ट चार्जिंगसह येईल. कंपनीच्या मते, V50 हा मोठ्या बॅटरीसह सर्वात स्लिम स्मार्टफोनपैकी एक असेल. मात्र, लक्षात घ्या की, फोनची खरी किंमत आणि कन्फर्म स्पेसिफिकेशन्स Vivo V50 5G लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile