50MP कॅमेरासह लेटेस्ट Samsung Galaxy F06 5G भारतात लाँच, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी 

HIGHLIGHTS

स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F06 5G भारतात लाँच

कंपनीने हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F06 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप

50MP कॅमेरासह लेटेस्ट Samsung Galaxy F06 5G भारतात लाँच, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी 

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चे बजेट स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता याच लाईनअपमध्ये कंपनीने आणखी एक फोन भारतात लाँच केला आहे. होय, कंपनीने भारतात आपला स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F06 5G लाँच केला आहे. कंपनीने हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे. लक्षात घ्या की, कंपनीचा हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन अनेक उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy F06 5G फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: हजारो रुपयांच्या Discount सह मिळतोय लेटेस्ट Samsung Galaxy S25, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही

Samsung Galaxy F06 5G ची किंमत आणि उपलब्धता

Samsung ने Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोन 9,499 रुपयांना लाँच केला आहे, जो फोनच्या 4GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. त्याच वेळी, 6GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन बहामा ब्लू आणि लिट व्हायलेट या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री 20 फेब्रुवारीपासून Flipkart वर सुरू होईल.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गेल्या वर्षी कंपनीने 7,999 रुपयांच्या किमतीत सॅमसंग गॅलेक्सी F05 फोन सादर केला होता, जो 4G सपोर्टसह आला होता.

Samsung Galaxy F06 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F06 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला वाढीव AI क्षमता आणि प्रगत गेमिंग आणि मल्टीटास्किंग सारख्या उच्च-स्तरीय वैशिष्ट्यांसाठी समर्थन मिळेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज आहे. एवढेच नाही तर, या फोनसह तुम्हाला 4 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी पॅच अपडेट्स मिळतील.

samsung galaxy f06 5g

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F06 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली गेली आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. तसेच, ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo