हजारो रुपयांच्या Discount सह मिळतोय लेटेस्ट Samsung Galaxy S25, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही 

HIGHLIGHTS

Samsung ने अलीकडेच Samsung Galaxy S25 स्मार्टफोन सिरीज लाँच केली.

Samsung च्या नवीनतम Samsung Galaxy S25 स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर उपलब्ध

या स्मार्टफोनचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुधारित Galaxy AI होय.

हजारो रुपयांच्या Discount सह मिळतोय लेटेस्ट Samsung Galaxy S25, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही 

आपणा सर्वांना माहितीच आहे की, साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक दिग्गज Samsung ने अलीकडेच Samsung Galaxy S25 स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. जर तुम्ही देखील नवा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, Samsung च्या नवीनतम Samsung Galaxy S25 स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. होय, सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर हा फोन हजारो रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy S25 वरील डील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: अरे व्वा! Vivo V50 प्री-ऑर्डरवर मिळतील अप्रतिम बेनिफिट्स, जाणून घ्या काय मिळेल विशेष?

Samsung Galaxy S25 Series

Samsung Galaxy S25 वरील डिस्काउंट

Samsung Galaxy S25 स्मार्टफोनवर Amazon द्वारे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलवर दोन ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्यातून तुम्ही निवडू शकता. पहिली म्हणजे HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे Samsung Galaxy S25 खरेदीवर 7000 रुपयांपर्यंतची बँक सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर, एक्सचेंज ऑफरअंतर्गत तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करून 8000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. अतिरिक्त ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर्स अंतर्गत, तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी Amazon ला भेट द्या.

Samsung Galaxy S25 चे फीचर्स आणि स्पेक्स

Samsung Galaxy S25 च्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.2 इंच लांबीचा कॉम्पॅक्ट डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुधारित Galaxy AI होय. जो आता पूर्वीपेक्षा अधिक फीचर्स प्रदान करतो. त्याबरोबरच, हा स्मार्टफोन पॉवरफुल आणि नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह येतो, जो सध्याच्या घडीला सर्वात वेगवान चिपसेटपैकी एक मानला जात आहे. लक्षात घ्या की, ही चिपसेट विशेषतः स्मार्टफोन्सची पॉवर वाढवण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

Samsung Galaxy S25 5G
Samsung Galaxy S25

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP चा मुख्य OIS कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 10MP चा OIS टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 12MP चा रुंद कॅमेरा देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनला 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W वायर्ड, 15W वायरलेस आणि 4.5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo