Upcoming Smartphones Launch: टेक विश्वात धुमाकूळ घालायला येतायेत जबरदस्त स्मार्टफोन्स, iPhone SE 4, Nothing यादीत समाविष्ट
टेक विश्वात लवकरच अनेक रोमांचक स्मार्टफोन लाँच होणार आहेत.
Apple पुढील आठवड्यात कदाचित iPhone SE 4 लाँच करणार आहे.
आगामी Google Pixel 9a हा आधीच्या Google Pixel 9 सारखाच दिसण्याची अपेक्षा आहे.
Upcoming Smartphones Launch: अनेक स्मार्टफोन निर्माता आपल्या नवनवीन टेक्नॉलॉजीसह आगामी स्मार्टफोन्सवर काम करत आहेत. तर, त्यापैकी काही कंपन्या आपले नवे आणि जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. होय, टेक विश्वात लवकरच अनेक रोमांचक स्मार्टफोन लाँच होणार आहेत, ज्यामध्ये iPhone SE 4, Pixel 9a आणि Nothing Phone 3a इ. प्रसिद्ध आणि मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अपग्रेडेड कॅमेऱ्यांपासून ते शक्तिशाली प्रोसेसरपर्यंत, ही उपकरणे मोठ्या सुधारणांचे आश्वासन देतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात आगामी स्मार्टफोन्सची यादी-
SurveyAlso Read: आगामी Realme P3 Pro मध्ये मिळतील अत्याधुनिक फीचर्स! जाणून घ्या लाँच डेट, अपेक्षित किंमत

iPhone SE 4
जगप्रसिद्ध टेक जायंट Apple पुढील आठवड्यात कदाचित iPhone SE 4 लाँच करणार आहे. या बजेट-फ्रेंडली iPhone मध्ये मोठ्या डिझाइन अपग्रेडची अपेक्षा आहे आणि अखेर होम बटण सोडून फुल-स्क्रीन 6.1 इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात फेस आयडीचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12MP ते 48MP सेन्सरपर्यंत मोठा कॅमेरा अपग्रेड असण्याचीही अफवा आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, किंमत मागील SE मॉडेलपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.
Nothing Phone 3a

Nothing Phone 3a भारतात पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये लाँच केला जाईल. लीकवरून असे दिसून येते की, Nothing Phone 3a मध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर असू शकतो. डिस्प्लेबद्दलची माहिती अद्याप स्पष्ट नसली तरीही त्यात त्याच्या आधीच्या सारखीच 6.7-इंच लांबीची 120Hz AMOLED स्क्रीन असण्याची शक्यता आहे. हा फोन eSIM ला देखील सपोर्ट करू शकतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना ड्युअल नॅनो-सिम किंवा eSIM असलेले एक भौतिक सिम यापैकी एक निवडता येणार आहे. इतर माहिती फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.
Google Pixe 9a
आगामी Google Pixel 9a हा आधीच्या Google Pixel 9 सारखाच दिसण्याची अपेक्षा आहे. लीक अहवालानुसार , या फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा Actua डिस्प्ले आणि गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. Google च्या Tensor G4 चिपद्वारे समर्थित, तो 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देऊ शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रावाइड लेन्स असण्याची अफवा आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,100mAh बॅटरी आणि 23W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट असेल. फोनबद्दल योग्य माहिती लाँच झाल्यावरच पुढे येईल.
Xiaomi 15 Ultra
Xiaomi चीनमध्ये प्री-रिझर्वेशन आधीच सुरू असून Xiaomi 15 Ultra लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. या फोनमध्ये 16GB रॅमसह पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर असण्याची चर्चा आहे. यात एक जबरदस्त 2K क्वाड-कर्व्ह डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. फोटोग्राफीसाठी, यात आकर्षक कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50MP Sony LYT-900 मुख्य सेन्सर, 200MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि टेलिफोटो आणि मॅक्रो शॉट्ससाठी दोन अतिरिक्त 50MP सेन्सर आहे. Leica ब्रँडिंगसह, Xiaomi फोटोग्राफीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे हा फोन कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम पर्याय बनेल, अशी माहिती मिळाली आहे.
Oppo Find N5
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo येत्या 20 फेब्रुवारी रोजी सिंगापूर आणि चीनमध्ये आपला नवीन फोल्डेबल फोन, Oppo Find N5 लाँच करणार आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, यात एक मजबूत, 3D-प्रिंटेड टायटॅनियम अलॉय हिंग देखील सादर केला जात आहे, ज्यामुळे फोन अधिक टिकाऊ होईल. Find N5 हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपद्वारे कार्य करेल. हा फोन IPX6, IPX8 आणि IPX9 वॉटर रेझिस्टन्सला सपोर्ट करेल. यात 50W वायरलेस चार्जिंग आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile