32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Vivo Y300 5G वर तब्बल 7000 रुपयांचा Discount, फोटोग्राफीसाठी मिळतात विशेष फीचर्स 

HIGHLIGHTS

Vivo Y300 5G मिड बजेट फोन प्रचंड सवलतीसह उपलब्ध

Vivo Y300 5G फोन 25,000 रुपयांअंतर्गत येतो, जो Flipkart मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे.

Vivo Y300 5G फोनच्या मागील बाजूस Sony AI Aura Light रिंग उपलब्ध आहे.

32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Vivo Y300 5G वर तब्बल 7000 रुपयांचा Discount, फोटोग्राफीसाठी मिळतात विशेष फीचर्स 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo सध्या भारतीय बाजारात शीर्षस्थानी असलेल्या स्मार्टफोन्सपैकी एक आहे. Vivo चे Y सिरीजचे स्मार्टफोन्स कंपनीचे आकर्षक आणि पॉवरफुल स्मार्टफोन्स आहेत. हे स्मार्टफोन्स कंपनीने मिड बजेटमध्ये सादर केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Vivo Y300 5G वर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. या फोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी विशेष फीचर्स मिळतील. हा फोन 25,000 रुपयांअंतर्गत येतो, पण Flipkart वर सध्या हा फोन मोठ्या प्रमाणात सवलतींसह उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y300 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Valentines Day Gift Ideas: हटके अंदाजात साजरा करा व्हॅलेंटाईन डे! तुमच्या पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी Best गॅजेट्स

Latest Vivo Y300 5G gets big discount on Amazon check top 5 feature

Vivo Y300 5G ची किंमत आणि ऑफर्स

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y300 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 26,999 रुपयांना सूचीबद्ध आहे, जी तुम्ही आता 21,999 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला हा फोन 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Vivo Y300 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y300 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. चांगली परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आहे, तर फोनमध्ये स्टोरेजसाठी 128GB आणि 256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP64 रेटिंग मिळाले आहे.

vivo y300 5g with 16gb ram and snapdragon processor
vivo y300 5g

Vivo Y300 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 2MP चा सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस Sony AI Aura Light रिंग उपलब्ध आहे. तसेच, आकर्षक फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फ्लशचार्ज सपोर्टसह येते.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo