आगामी Samsung Galaxy F06 5G भारतीय लाँचची तारीख Confirm! किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी

HIGHLIGHTS

Samsung ने Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट अखेर निश्चित केली.

हा कंपनीच्या F सिरीजमधील नवीन बजेट 5G स्मार्टफोन आहे, जो बजेट किमतीत येईल.

Samsung Galaxy F06 5G फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे.

आगामी Samsung Galaxy F06 5G भारतीय लाँचची तारीख Confirm! किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट अखेर निश्चित केली आहे. आगामी स्मार्टफोनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. हा कंपनीच्या F सिरीजमधील नवीन बजेट 5G स्मार्टफोन आहे, जो कंपनी 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करत आहे. हा फोन Flipkart वरून खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच या फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. एवढेच नाही तर, या साईटद्वारे फोनचे अनेक फीचर्स उघड करण्यात आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy F06 5G ची भारतीय लाँच डेट-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Free! Samsung च्या Galaxy Watch Ultra वर अविश्वसनीय ऑफर, फक्त एकच अट आणि महागडी वॉच मोफत

Samsung Galaxy F06 5G चे भारतीय लाँच

samsung galaxy f06 5g

Samsung कंपनीने Samsung Galaxy F06 5G फोनच्या लाँचिंग तारखेची पुष्टी केली आहे. हा फोन 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. वर सांगितल्याप्रमाणे, फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे फोनचे अनेक फीचर्स उघड करण्यात आले आहेत. या फोनची किंमत 9,XXX म्हणजेच 10,000 रुपयांअंतर्गत असेल, असे सांगण्यात आले आहे.

Samsung Galaxy F06 5G चे तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, Flipkart लिस्टिंगद्वारे Samsung Galaxy F06 5G चे अनेक फीचर्स उघड करण्यात आले आहेत. Samsung च्या या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले दिला जाईल. तसेच स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर असेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅमचे पर्याय असतील. एवढेच नाही तर, या फोनमध्ये 4 ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स आणि 4 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्स देखील असतील.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F06 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh असेल, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन बहामा ब्लू आणि लिट व्हायलेट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. लक्षात घ्या की, फोनची योग्य किंमत फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo