भारीच की! Lava Blaze Curve 5G वर मिळतोय 5,000 रुपयांपर्यंत Discount, जाणून घ्या ऑफर्स 

HIGHLIGHTS

Lava ने मार्चमध्ये आपला Lava Blaze Curve 5G स्मार्टफोन लाँच केला होता.

सध्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे.

आकर्षक सेल्फीसाठी Lava Blaze Curve 5G मध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

भारीच की! Lava Blaze Curve 5G वर मिळतोय 5,000 रुपयांपर्यंत Discount, जाणून घ्या ऑफर्स 

देशी स्मार्टफोन निर्माता Lava ने या वर्षी मार्चमध्ये आपला Lava Blaze Curve 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन लाँच होताच भारतीय वापरकर्त्यांनी या फोनला खूप चांगले रेटिंग दिले आहे. दरम्यान, कंपनी या फोनवर आता 3,500 रुपयांची सूट देत आहे. तसेच, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, EMI इ. अनेक ऑफर्स मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Lava Blaze Curve 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Motorola चा नवा स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत असेल 10 ते 15,000 रुपयांअंतर्गत

Lava Blaze Curve 5G Specification

Lava Blaze Curve 5G ची किंमत आणि ऑफर्स

Lava Blaze Curve 5G बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची लाँच प्राईस 17,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची लाँच प्राईस 18,999 रुपये इतकी आहे. मात्र, सध्या या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यांनतर फोनची किंमत अनुक्रमे 14,499 रुपये आणि 15,499 रुपये इतकी झाली आहे.

यावरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला डिव्हाइसवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. हे EMI आणि सामान्य व्यवहारांवर उपलब्ध असेल. तसेच, एक्सचेंज ऑफरअंतर्गत 13,950 रुपयांपर्यंत सूट मिळवता येईल. या ऑफर्ससह नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने Lava Blaze Curve 5G 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर देखील खरेदी केला जाऊ शकतो. अधिक महिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Lava Blaze Curve 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Blaze Curve 5G Specification

Lava Blaze Curve 5G मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED 3D कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, मागील पॅनलमध्ये EIS आणि 20X ऑप्टिकल झूम, 8MP वाइड-एंगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा लेन्ससह 64MP प्रायमरी कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,000mAh बॅटरी आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, चांगल्या ऑडिओसाठी डॉल्बी ॲटमॉस स्पीकर इ. आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo