WhatsApp : चॅट करणे होईल अधिक मजेशीर ! व्हीडिओ मॅसेजसह मिळतील अप्रतिम फीचर्स

HIGHLIGHTS

WhatsAppने अलीकडेच एक नवीन विंडो ऍप लाँच केले आहे.

32 लोकांच्या ऑडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

व्हिडीओ मॅसेज फीचर लवकरच बीटा युजर्ससाठी येणार

WhatsApp : चॅट करणे होईल अधिक मजेशीर ! व्हीडिओ मॅसेजसह मिळतील अप्रतिम फीचर्स

WhatsApp upcoming features : WhatsApp वर वापरकर्त्यांच्या सोयीसाठी सतत नवनवीन फीचर्स आणले जात आहेत. WhatsAppने अलीकडेच एक नवीन विंडो ऍप लाँच केले आहे, जे WhatsApp मोबाइल ऍपसारखे दिसते. यासोबतच या ऍपमध्ये 8 लोकांच्या व्हिडिओ कॉलिंगसारखे काही नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच 32 लोकांच्या ऑडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

व्हिडीओ मॅसेज फीचर

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, डेव्हलपर एका नवीन फीचरवर काम करत आहेत. जे iOS वापरकर्त्यांना व्हिडिओ मॅसेज पाठविण्यास अनुमती देईल. या फीचरच्या मदतीने iPhone यूजर्स 60 सेकंदांचा व्हिडिओ मॅसेज पाठवू शकणार आहेत. लवकरच हे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. 

व्हिडीओ मॅसेज फीचर सध्याच्या ऑडिओ मॅसेज प्रमाणेच असेल, असे म्हटले जात आहे. याचा अर्थ तुम्हाला फक्त कॅमेरा बटण टॅप करून धरून ठेवावे लागेल. त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तो टॅप करून पाठवावा लागतो.

WhatsApp चे आगामी फीचर्स 

WhatsApp कडून आणखी काही फीचर्सवर काम केले जात आहे. यामध्ये लांबलचक व्हॉइस मॅसेजसाठी ट्रान्सक्रिप्शन फीचर्स दिले जातील. तसेच, WhatsApp वरून पिक्चर इन पिक्चरसोबत, iOS साठी व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केली जाऊ शकते. मात्र, हे फीचर्स किती कालावधीनंतर लागू केले जातील. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo