रिचार्जशिवाय अगदी मोफत चालेल इंटरनेट! तुमच्या फोनमध्ये फक्त ‘हे’ ऍप डाउनलोड करा…

HIGHLIGHTS

रिचार्जशिवाय इंटरनेट वापरता येईल.

SugarBox ही ओपन क्लाउड सर्व्हिस आहे.

अनेक ग्रामीण भागात ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

रिचार्जशिवाय अगदी मोफत चालेल इंटरनेट! तुमच्या फोनमध्ये फक्त ‘हे’ ऍप डाउनलोड करा…

SugarBox ही ओपन क्लाउड सर्व्हिस आहे, जी दुर्गम भागात इंटरनेट सेवा पुरवण्याचे काम करते. ज्यामध्ये तुम्ही OTT ऍप्सचा मोफत आनंद घेऊ शकता. शुगरबॉक्स एक Android आणि iOS ऍप आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय OTT वापरू शकता. तसेच, खरेदीपासून ते इतर ऑनलाइन सेवांचा वापर करता येईल. हे ऍप एक बेस्ट सर्व्हिस आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Jio च्या 'या' प्लॅनने Airtel-Vi ला टाकले मागे, 252 दिवसांपर्यंत रिचार्जपासून होईल सुटका

'अशा'प्रकारे करा वापर 

– Apple App Store आणि Google Play Store वरून SugarBox ऍप डाउनलोड करा.

– यानंतर मोबाईल फोनची इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करा.

– त्यानंतर तुम्हाला SugarBox ऍपची Wi-Fi कनेक्टिव्हिटी चालू करावी लागेल.

– यानंतर तुम्ही हाय कॉलिटी म्युझिक आणि शोचा मोफत आनंद घेऊ शकाल.

– हे ऍप स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपवर वापरता येईल.

मोफत चालवता येईल Wi-Fi

SugarBox वाय-फाय सेवेचा वापर कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे केला जात आहे. यात हायपरलोकल एज क्लाउड टेक्नॉलॉजी सोल्यूशन प्रदान केले जाईल. ही सेवा देशात सुरू करण्यात आली आहे. या वाय-फायची रेंज 100 मीटर आहे. यामुळे यूजर्स इंटरनेटशिवाय OTT ऍप्सचा आनंद घेऊ शकतील. तसेच, या सेवेच्या मदतीने तुम्हाला गेमिंग आणि सोशल मीडियाचा आनंद घेता येईल. 

अनेक ग्रामीण भागात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच, इन-फ्लाइट सेवा दिली जात आहे. तसेच, डोंगराळ भागांसाठी ही एक उत्तम सेवा असू शकते. ही सेवा शिक्षण क्षेत्रासाठी उत्कृष्ट ठरेल, असा विश्वास आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo