Oppo चा उत्कृष्ट फोन 12GB RAM आणि जबरदस्त डिस्प्लेसह लाँच, 64MP कॅमेरासह मिळतील सर्वोत्तम फीचर्स

HIGHLIGHTS

Oppo K10 Vitality Edition स्मार्टफोन बाजारात लाँच

फोन 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज पर्यायामध्ये लाँच करण्यात आला

नवीन स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा उपलब्ध

Oppo चा उत्कृष्ट फोन 12GB RAM आणि जबरदस्त डिस्प्लेसह लाँच, 64MP कॅमेरासह मिळतील सर्वोत्तम फीचर्स

Oppo ने आपला नवीन K10 सिरीज स्मार्टफोन Oppo K10 Vitality Edition बाजारात लाँच केला आहे. हा फोन 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज पर्यायामध्ये लाँच करण्यात आला आहे. फोन अनेक प्रीमियम फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनी 120Hz डिस्प्ले आणि 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देत आहे. हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत 2199 युआन  म्हणजेच जवळपास 26 हजार रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये येतो. कंपनी लवकरच फोन भारतातही लाँच करेल अशी अपेक्षा आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : त्वरा करा! प्राइम डे 2022 नंतर Amazon च्या 'या' सेलमध्ये मिळतील आकर्षक ऑफर्स, फक्त दोन दिवस बाकी

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.59 इंच फुल HD + डिस्प्ले आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट  आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. कंपनीने हा फोन 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज सह लाँच केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट प्रोसेसर म्हणून दिला जात आहे.

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 64-मेगापिक्सेल प्रायमरी  कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज, हा फोन 5000mAh बॅटरीने समर्थित आहे. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, Oppo च्या या नवीन फोनमध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, NFC, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo