नवीन सब्सक्राइबर्स साठी TATA Sky चा 44 टक्के डिस्काउंट

HIGHLIGHTS

TATA Sky आपल्या नवीन सब्सक्राइबर्सना 44 टक्के डिस्काउंट देत आहे. चला जाणून घेऊया की तुम्हाला काय काय मिळत आहे.

नवीन सब्सक्राइबर्स साठी TATA Sky चा 44 टक्के डिस्काउंट

TATA Sky देशातील एक मोठी डायरेक्ट टू होम म्हणजे DTH सेवा देणारी कंपनी आहे. हि भारतीय यूजर्सना अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. हि सेवा अजून जास्त परवडण्याजोगी बनवण्यासाठी कंपनीने आपल्या नवीन सब्सक्राइबर्सना 44 टक्के डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनीच्या दिवाळी फेस्टिव ऑफरचा एक भाग म्हणून नवीन सब्सक्राइबर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकतात, आणि जवळपास Rs 2,000 पर्यंत वाचवू शकतात. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या ऑफर मध्ये सब्सक्रिप्शन पॅक आणि तसेच काही क्षेत्रीय पॅक फ्री मध्ये मिळत आहेत, तसेच दोन वेगवेगळ्या डिवाइस साठी कंपनी कडून टाटा स्काय मोबाईल ऍप्पचे सब्सक्रिप्शन पण फ्री मध्ये दिले जात आहे. अजून एक बातमी पाहिली असता टेलीकॉमटॉक ची एक रिपोर्ट नुसार या सेवेत आता तुम्हाला जवळपास सर्व 32 चॅनेल सोनी नेटवर्कचे पण मिळत आहेत. याचा अर्थ असा की येत्या काळात हे चॅनेल तुम्हाला टाटा स्काय सोबत मिळणार आहेत. 

TATA Sky ची डिस्काउंट ऑफर आणि त्याचे डिटेल्स

विशेष म्हणजे या सेवे आणि डिस्काउंट सोबत तुम्हाला जवळपास 246 SD आणि 24 HD चॅनेल मिळत आहेत. याव्यतिरिक्त तुम्हाला क्षेत्रीय पॅक या पॅक सोबत फ्री मध्ये दिला जात आहे. तसेच दोन वेगवेगळ्या मोबाईल फोन्स वर टाटा स्कायच्या मोबाईल ऍप्पचा पण वापर करू शकता. यासाठी पण कंपनी कडून तुम्हाला सुविधा दिली जात आहे. या प्लानची खरी किंमत पाहता ती जवळपास Rs 5,350 ची आहे, पण जर तुम्ही या प्लान मध्ये डिस्काउंट इत्यादी जोडला तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला यावर जवळपास 44 टक्क्यांची सूट मिळत आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या प्लान सोबत जवळपास Rs 2,351 ची सूट मिळत आहे आणि या डिस्काउंट नंतर हा प्लान Rs 2,999 चा होतो. 

दुसऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला 44 टक्क्यांचाच डिस्काउंट दिला गेला पाहिजे होता पण यात तुम्हाला 42 टक्क्यांचा डिस्काउंट दिला जात आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 241 SD आणि 55 HD चॅनेल मिळत आहेत. तसेच हा प्लान तुम्हाला दोन वेगवेगळे क्षेत्रीय पॅक पण ऑफर करत आहे. दिवाळी फेस्टिव ऑफर नंतर, हं प्लान तुम्हाला Rs 1,690 मध्ये मिळतो, पण याची खरी रेंटल किंमत Rs 2,935 आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo