हा आहे रिलायंस जियोचा दमदार प्लान याला कोणीच देऊ शकत नाही टक्कर

HIGHLIGHTS

168GB 4G डेटा व्यतिरिक्त Rs 448 मध्ये येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये रिलायंस जियो देत आहे भरपूर काही, जाणून घ्या या दमदार प्लान बद्दल सर्वकाही...

हा आहे रिलायंस जियोचा दमदार प्लान याला कोणीच देऊ शकत नाही टक्कर

रिलायंस जियो ने कित्येक महिने झाले आपले टॅरिफ प्लान्स रिवाइज केले नाहीत. इतर टेलिकॉम कंपन्या जसे कि BSNL, भारती एयरटेल आणि वोडाफोन आईडिया ने अनेक प्लान्स सादर केले आहेत पण कधी जियोला मात देऊ शकल्या नाहीत. जियो ने आपल्याला भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोजच्या SMS चे जणू वरदान दिले होते आणि त्यानंतर जवळपास सर्वच कंपन्या त्या दिशेने वाटचाल करू लागल्या. जसे जसे जियोचे प्लान वाढत गेले तसा तसा फायदा आपल्याला म्हणजे सब्सक्राइबर्सना जास्त फायदा झाला आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

सध्या कंपनी आपले कॉम्बो प्लान्स विकत आहे. यात तुम्हाला 1.5GB डेटा पासून 5GB डेटा रोज ऑफर केला जात आहे. तसेच तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंग पण मिळत आहे, सोबतच इतर अनेक लाभ पण तुम्हाला मिळत आहेत. जियोच्या Rs 448 मध्ये येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 168GB डेटा मिळत आहे, जो इतर कोणतीही टेलीकॉम कंपनी तुम्हाला अजूनतरी देऊ शकली नाही. 

विशेष म्हणजे सध्या 2GB वाले डेटा पॅक्स सर्वात जास्त वापरले जात आहेत, लोकांनाच्या हे जास्त उपयोगी पडतात. चला जाणून की 2GB डेटा वाले किती प्लान आहेत आणि यांत तुम्हाला कोणत्या सुविधा मिळत आहे. 

या श्रेणीत रिलायंस जियो कडून वेगवेगळ्या वैधतेसह जवळपास 4 प्लान्स बाजारात आहेत. या श्रेणीत सर्वात पहिला प्लान Rs 198 मध्ये येणार आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह 2GB डेली डेटा मिळत आहे. त्यांनतर येतो तो रिलायंस जियोचा पुढील प्लान Rs 398 मध्ये येतो, या प्लान मध्ये तुम्हाला 70 दिवसांसाठी 2GB डेली डेटा मिळत आहे, म्हणजे तुम्हाला या रिचार्ज प्लान मध्ये 140GB डेटा मिळणार आहे. 

तिसऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर रिलायंस जियो कडे अजून एक प्लान पण आहे, जो Rs 448 मध्ये येतो. या प्लान मध्ये तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसाठी 2GB डेली डेटा मिळत आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 168GB डेटा मिळत आहे. आईडिया कडे पण आता असाच एक प्लान आहे. अजून एका म्हणजे चौथा प्लॅन पण आहे जो तुम्हाला Rs 498 मध्ये मिळतो आणि यात तुम्हाला 2GB डेली डेटा पण मिळतो. या प्लानची वैधता 91 दिवस आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या प्लान मध्ये एकूण 182GB डेटा मिळत आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo