BSNL यूजर्सना मिळाली नवीन भेट, बीएसएनएलचा ऍप डाउनलोड केल्यावर मिळत आहे 1GB फ्री डेटा

HIGHLIGHTS

बीएसएनएल म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड आपल्या यूजर्सना आपल्या कडे कायम ठेवण्यासाठी गेल्या काही काळात अनेक उपाय करत आहे, पुन्हा एकदा एक नवीन उपाय समोर आला आहे. असे समोर येत आहे कि जर बीएसएनएल यूजर असल्यास तुम्ही आणि तुम्ही नवीन माय बीएसएनएल मोबाइल ऍप डाउनलोड केल्यास तुम्हाला 1GB फ्री डेटा दिला जाईल.

BSNL यूजर्सना मिळाली नवीन भेट, बीएसएनएलचा ऍप डाउनलोड केल्यावर मिळत आहे 1GB फ्री डेटा

बीएसएनएल म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड आपल्या यूजर्सना आपल्या कडे कायम ठेवण्यासाठी गेल्या काही काळात अनेक उपाय करत आहे, पुन्हा एकदा एक नवीन उपाय समोर आला आहे. असे समोर येत आहे कि जर बीएसएनएल यूजर असल्यास तुम्ही आणि तुम्ही नवीन माय बीएसएनएल मोबाइल ऍप डाउनलोड केल्यास तुम्हाला 1GB फ्री डेटा दिला जाईल. या नवीन ऍप बद्दल कंपनी ने माहिती दिली आहे कि हा बीएसएनएल ऍप कॉल2 एक्शन कम्युनिकेशन इंडिया सह भागीदारी करून निर्माण करण्यात आला आहे. आतापर्यंत बीएसएनएल कडे एक चांगला ऍप नव्हता. पण आता कंपनी ने आपला माय बीएसएनएल ऍप रीव्हॅम्प केला आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या नवीन बीएसएनएल ऍप मध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंट संबंधित माहिती मिळणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या नंबर व्यतिरिक्त दुसऱ्याच्या नंबरला पण या  ऍप मधून रिचार्ज करू शकता. त्याचबरोबर हा ऍप डाउनलोड केल्यास तुम्हाला 30 दिवसांच्या वैधते सह 1GB डेटा फ्री दिला जात आहे. 

कशाप्रकारे मिळेल बीएसएनएल चा 1GB फ्री डेटा
वर सांगितल्याप्रमाणे माय बीएसएनएल ऍप डाउनलोड केल्यावर बीएसएनएल कडून त्यांच्या यूजर्सना 1GB डेटा फ्री दिला जात आहे. यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोर वर जाऊन एक नवीन रूपात समोर आलेला माय बीएसएनएल ऍप डाउनलोड करावा लागेल. हा 1GB डेटा तुम्हाला 30 दिवसांच्या वैधते सह मिळणार आहे आणि हा डेटा तुम्ही तुमच्या वर्तमान डेटा पॅक सोबत पण वापरू शकता.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo