Essential PH-1 नवीन कलर ऑप्शन मध्ये होऊ शकतो लाँच

HIGHLIGHTS

Essential PH-1 डिवाइस ब्लू किंवा हिरव्या रंगाच्या नव्या आॅप्शन मध्ये येऊ शकतो.

Essential PH-1 नवीन कलर ऑप्शन मध्ये होऊ शकतो लाँच

Essential PH-1 स्मार्टफोन च्या लाँच नंतर कंपनी याला अपडेट करण्यासाठी बॅकग्राउंड मध्ये चुपचाप काम करत आहे.. कंपनी कॅमरा आणि शूटिंग सुविधांमध्ये सह फोनला अपडेट करत आहे. सोबतच ओरियो बीटा टेस्टिंग पण सादर करण्यात आली आहे. तसेच रेडिट AMAs ठेवण्यात आला आहे जेणेकरून ग्राहकांना येणार्‍या समस्या आणि प्रश्न सोडवले जाऊ शकतील. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

कंपनी ने ट्विटर वर एक टीजर पोस्ट केला आहे, ज्यानुसार कंपनी डिवाइसला नव्या कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यासाठी तयार आहे. ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे की "एक नवी लाट (वेब) येत आहे" यावरुन अंदाज लावला जातो आहे की हा फोन ब्लू किंवा हिरव्या रंगात येऊ शकतो, ज्याची कंपनी ने PH-1 च्या पहिल्या प्री-ऑर्डर दरम्यान घोषणा केली होती. 
टीजर मध्ये आजची तारीख, म्हणजेच 15 फेब्रुवारी दाखविण्यात आली आहे, शक्यता आहे की PH-1 डिवाइस चा नवीन कलर ऑप्शन आज लाँच होऊ शकतो. त्यामुळे कदाचित कंपनी प्री-ऑर्डर च्या ऑर्डर घेण्यास स्थगित देऊ शकते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo