मोटो X प्ले स्मार्टफोनवर मिळतेय २००० रुपयांचा भारी डिस्काउंट

HIGHLIGHTS

मोटो X प्ले स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या एक्सचेंज ऑफरद्वारा मिळत आहे.

मोटो X प्ले स्मार्टफोनवर मिळतेय २००० रुपयांचा भारी डिस्काउंट

फ्लिपकार्टवर खरेदी करा मोटो X प्ले (32GB) 17,499 रुपये

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

फ्लिपकार्टवर खरेदी करा मोटो X प्ले (16GB) 15,499 रुपये

मोटोरोला मोटो X प्ले स्मार्टफोनवर आज जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. तथापि, हा डिस्काउंट काही वेळापुरताच आहे. ह्या ऑफरद्वार आपल्याला मोटो X प्ले ह्या स्मार्टफोनवर २००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ह्याला आपण फ्लिपकार्टच्या माध्यमातूनही खरेदी करु शकता.

मोटो X प्ले (टर्बो चार्जसह) 16GB च्या व्हर्जनची मूळ किंमत १७,४९९ रुपये आहे, तर 32GB व्हर्जनची किंमत १८,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टच्या ह्या ऑफरमध्ये मोटो X प्ले 16GB व्हर्जन १५,४९९ रुपयात आणि 32GB व्हर्जन १७,४९९ रुपयात मिळत आहे.

मोटो X प्ले मध्ये ५.५ इंचाची FHD डिस्प्ले 400ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. फोनमध्ये क्वालकॉम 615 प्रोसेसरसह 1.7GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरला 2GB च्या रॅमसह पेयर केले गेले आहे. आणि जसे की आपण मागील फोन मोटो X स्टाइलमध्ये पाहिले होते, त्याप्रमाणे हा स्मार्टफोनसुद्धा 4G LTE सपोर्टने सुसज्ज असेल आणि हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो.

हेदेखील पाहा – मोटो G4 प्लस रिव्ह्यू

ह्या स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. मात्र ह्या स्मार्टफोनचा व्हिडियो कॅप्चर मोड मागील फोनपेक्षा थोडा वेगळा आहे. मात्र ह्या स्मार्टफोनमध्ये 3630mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 16GB आणि 32GB च्या स्टोरेज पर्यायासह उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा – अखेर भारतात लाँच झाला लेनोवो वाइब K5 स्मार्टफोन, किंमत ६,९९९ रुपये
हेदेखील वाचा – 
2GB रॅमने सुसज्ज आहे RDP थिन बुक लॅपटॉप लाँच, किंमत ९,९९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo