भारतात लाँच झाला सोनी A68 A-Mount DSLR, किंमत ५५,९९० रुपये

HIGHLIGHTS

सोनीने भारतात आपला नवीन DSLR A68 लाँच केला, ज्याची किंमत ५५,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय ह्याला आपण दोन व्हर्जनमध्ये खरेदी करु शकता.

भारतात लाँच झाला सोनी A68 A-Mount DSLR, किंमत ५५,९९० रुपये

आजकालच्या सर्व स्मार्टफोन्समध्ये कॅमेरा फीचर फार महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे बाजारात अशा अनेक कॅमेरा फीचर स्मार्टफोन्सचा सुळसुळाट पाहायला मिळतो. मात्र ज्या लोकांना DSLR विषयी माहिती आहे, ते जाणतात की बाजारात कितीही उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स आले तरी ते DSLR ला टक्कर देऊ शकणार नाही. कारण एका DSLR आणि स्मार्टफोनमध्ये बराच फरक आहे. सोनी ह्या सर्व गोष्टी जाणून आहे म्हणूनच त्यांनी आपला नवीन DSLR बाजारात आणला आहे आणि आपल्या DSLR कॅमे-याच्या वर्गात एक नवीन नाव जोडले आहे. सोनीने भारतात आपला नवीन DSLR A68 लाँच केला आहे, ज्याची किंमत आहे ५५,९९० रुपये. त्याशिवाय हा दोन व्हर्जनमध्ये मिळत आहे. ह्यातील एक कॅमेरा 18-55mm लेन्सचा आहे, ज्याची किंमत आहे ५५,९९० रुपये आणि दुसरा कॅमेरा 18-135mm लेन्स, ज्याची किंमत आहे ८५,९९० रुपये.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्या कॅमे-याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे 4D फोकस फीचर. ह्यात जो कॅमेरा वापरला जात आहे तो 79AF पॉइंट्सचा आहे आणि ज्याने खूप  आकर्षक आणि शार्प फोटो येतात. त्याशिवाय हे फीचर सोनीच्या A77M2 मध्येही दिले गेले आहे आणि आता सोनीच्या ह्या कॅमे-यातही हे फीचर आहे.

त्याशिवाय ह्यात 24 मेगापिक्सेलचा APS-C एक्समोर सेंसरसह ISO सपोर्टसुद्धा आहे, ज्याची रेंज 100-25600 आहे. ह्या कॅमे-याच्या माध्यमातून आपण ५० फ्रेम पर सेकंदच्या हिशोबाने 1080pची FHD व्हिडियो रेकॉर्डिंग करु शकतात. त्याचबरोबर ह्यात 2.7 इंचाची LCD मॉनिटर स्क्रीन दिली गेली आहे, जी खूपच चांगली आहे.

हेदेखील वाचा – सोनी एक्सपिरिया Z2, Z3, Z3 कॉम्पॅक्टला अॅनड्रॉईड मार्शमॅलोचे अपडेट मिळणे सुरु

हेदेखील वाचा – ह्या रेडिओ अॅप्सद्वारा मनसोक्त आनंद घ्या मराठीतील सदाबहार गाण्यांचा

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo